We Support Vijayrao Auti
माननीय शिवसेना पक्षप्रमुख!!
मागील काही दिवसापासून पारनेरच्या नगरसेवकांचे जे प्रकरण चालु आहे त्याविषयी थोडक्यात काही गोष्टी आपणास सांगु इच्छितो.
शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात ४ जुलै ला गेले आणि ९ जुलै ला परत शिवबंधनात आले हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिले.
खरं पाहिले तर चारच नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे होते त्यापैकी एक हा अपक्ष नगरसेवक आहे.
२०१५ साली पारनेर नगरपंचायतीची निवडणूक झाली त्यात १७ पैकी ९ नगरसेवक निवडून आलेले आहेत.
त्यामुळे शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत असताना सुद्धा अपक्ष निवडून आलेले ५ नगरसेवक शिवसेनेच्या बाजूने आले आणि पारनेर नगरपंचायतीवर भगवा फडकला.
अडीच वर्षाचा कालावधी संपत आला आणि शिवसेना पक्षातील काही नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होऊ लागले.
परंतु आमदार विजयराव औटी यांनी सारासार विचार करून आताच राष्ट्रवादी मध्ये चाललेल्या एका महिला सदस्याचे नाव अंतिम करत असतानाच फक्त सत्तेच्या लालसे पोटी काही नगरसेवकांनी बंड केले व एका अपक्ष नगरसेवकानी नगराध्यक्षा पदासाठी अर्ज केलेला होता त्याला आपला पाठिंबा दिला.
सदर अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष झाल्यावर परत शिवसेनेकडे आला परंतु बंडखोर नगरसेवकांची मात्र गोची झाली आणि त्यातूनच आमदार विजयराव औटी यांना त्रास देणें सुरु झाले.
याच सत्तेची हाव म्हणून पुढील भाग की परत एकदा सत्तेच्या वळचणीला गेले आणि त्यांचा डाव माननीय अजितदादा आणि खुद्द मुख्यमंत्री यांनी हाणून पाडल्यावर आता परत औटी साहेबांना शिवसेना पक्षातून काढा असा बालिश पणा चालु केला आहे.
वास्तविक आम्ही पारनेर तालुक्यातील सर्व शिवसैनिक विजयराव औटी साहेबांच्या बरोबर खंबीरपणे उभे आहोत.
आमची आपणास विनंती आहे आपण सदर प्रकरणात लक्ष घालून सदर संबंधित लोकांना समज द्यावे जेणेकरून शिवसेना पक्षाचे पारनेर तालुक्यातील नुकसान होणार नाही.
आता सध्या जी काही टीका विजयराव औटी साहेबांवर होते आहे ती खरंच असती तर पारनेर नगर तालुक्यातील जनतेने त्यांना आमदार पदी सलग तीन वेळा निवड कशी केली असती हाही एक प्रश्न आहेच.
चाललेल्या घडामोडींवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व प्रकार चाललेला आहे असे एकंदरीत दिसत आहे.
आमची आपणास विनंती आहे आपण माननीय विजयराव औटी यांना आपण विधानपरिषद सदस्य पदी निवड करावी अशी आमच्या पारनेर नगर तालुक्यातील शिवसैनिकांची इच्छा आहे.
औटी साहेब यांचा स्वभाव नक्कीच कडक असल्यामुळे त्यांच्या बाबतीत कायमच चुकीचा अर्थ काढला जातो आणि राजकारणात ते ओघाने येतेच.
आपण आमच्या विनंतीचा नक्कीच विचार कराल अशी आम्ही सर्व शिवसैनिक आशा बाळगतो.
आपले विश्वासू,
शिवसैनिक पारनेर-नगर तालुका..
Comment